Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यातील देवर्डे ग्रामपंचायत कारभाराची चौकशीची करावी

सांगली (प्रतिनिधी)
देवर्डे ता. वाळवा येथील ग्रामपंचायतीने केलेल्या बेकायदेशीर, अन्यायकारक कामकाजाची चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी देवर्डे येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती श्रीमती शोभा हिंदुराव पाटील यांनी दिली आहे.

निवेदनात म्हंटले आहे, देवर्डे येथील
ग्रामपंचायत सदस्यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर रित्या मिळकतदारांच्या मिळकती हडप करणेसाठी दप्तरात हेराफेरी करणे, मिळकतदारांची नावे कमी करणे, चुकीच्या पध्दतीने रेकाॅर्डमध्ये खाडाखोड करणे असले प्रकार केल्याचे उघड होत आहे. त्याबाबतीत मिळकतदारांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद कडे माहिती अधिकार चा वापर करुन न्याय मागितला असता चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे.

माहिती अधिकारात चुकीच्या व दिशाभूल करणारी माहिती जात असल्याने अपिले केलेली असताना अपिलीय अर्ज पुन्हा ग्रामपंचायतकडेच वर्ग करुन मिळकतदारांच्या फसवणूकीचे प्रकार घडत असल्याने जिल्हाधिकारी यांना निवेदन देणेत आलेले. सदर ग्रामपंचायतीच्या मिळकती चा सिटी सर्वे झालेला नाही. तो होणार असल्याने मिळकतदारांनी आपल्या मिळकतीचे उतारे मागणी केलेनंतर प्रकरणे उघड होऊ लागली आहे.

कोणत्याही प्रकारची चौकशी, खुलासे न घेता, कायदेशीर पुरावे नसताना, ठराव करून नोंदी केल्या आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयाने आदेश देऊनही दखल घेतली जात नाही. यात ग्रामसेवकांना वाचविणेसाठी दिरंगाई केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.Post a Comment

0 Comments