Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली फळ मार्केटमध्ये लाॅकडाऊन नियमाचे उल्लंघन : महापालिकेकडून ८१ हजार ५०० दंड वसूल

: महापालिकेकडून ८१ हजार ५०० दंड वसूल 

सांगली (प्रतिनिधी) : सांगलीच्या फळ मार्केटमध्ये कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने 5 दुकानांवर आणि 4 विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. याचबरोबर वखारभागात कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल एका हॉटेलवर दंडात्मक कारवाई करीत या सर्व कारवाईतून 81,500 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अशोक कुंभार आणि पथकाने पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली आहे.

कोल्हापूर रोडवरील फळ मार्केट आवारात पहाटेच्या सुमारास अनेक व्यापारी आस्थापना सुरू असंल्याची माहिती मिळाल्यानंतर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अशोक कुंभार आणि एस एस खरात हे आपल्या टीमसहित त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी या ठिकाणी 5 व्यापारी आस्थापना कोरोना नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे निदर्शनास येताच महापालिकेच्या पथकाने या अस्थापनेला प्रत्येकी 10 हजाराचा दंड ठोठावला. तर याठिकाणी विनापरवाना वाहतूक करणाऱ्या 5 वाहनांवर सुद्धा पथकाने कारवाई केली. तसेच विनामास्क तिघांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत महापालिकेने ८१ हजार ५०० इतका दंड वसूल केला आहे. तर वखारभागमधील एक हॉटेल आस्वादवर आणि दोन वाहनांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत सहायक आयुक्त एस एस खरात, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर काळे, राजू गोंधळे यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments