Daily Mahasatta

Daily Mahasatta

म्हणून..संग्रामभाऊंनी घेतला वाढदिवस न करण्याचा निर्णय

कडेगाव (सचिन मोहिते) : सांगली जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांचा २३ मे रोजी वाढदिवस आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय संग्रामभाऊ देशमुख यांनी घेतला असल्याची माहिती कडेगांव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धनंजय (भैया) देशमुख यांनी दिली.
     
कडेपूर ता. कडेगांव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संग्राम (भाऊ) देशमुख यांचा २३ मे रोजी वाढदिवस आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस कोणत्याही स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घेवून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. 
  
राजकारणापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणारे आमचे नेते संग्रामभाऊ हे वाढदिवसानिमित्त गर्दी होऊ नये व त्याचा त्रास आपल्याच कार्यकर्ते व पदाधिकारी यांना होऊ नये म्हणून  वाढदिवसादिवशी कोणालाही भेटणार नाहीत. वाढदिवसा दिवशी संग्रामभाऊ मतदार संघात उपस्थित असणार नाहीत ते बाहेरगावी असणार आहेत. त्यामुळेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष शुभेच्छा पोहचवण्यासाठी काहीही कार्यक्रम करू नयेत व गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
   
कोरोनाचे हे महाभयानक संकट आहे. यामधुन आपण सर्व सहीसलामत बाहेर पडू. वाढदिवस होत राहतील पण कार्यकर्ता- पदाधिकारी अडचणीत आला तर मोठा धोका आहे. त्यामुळेच तर भाऊंच्यावरील आपले प्रेम व्यक्त करायचे असेल तर वाढदिवसानिमित्त कुठेही गर्दी करु नये. कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करणारे पोलीस , डॉक्टर , आरोग्य सेविका तसेच आरोग्य कर्मचारी या कोविड योद्धांचे काम कौतुक्कास्पद असे आहे . तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो . त्यांमुळे वाढदिवसा निमित्त कोणी कोठेही कार्यक्रम, गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments