Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने अंडी वाटप

शिराळा: तहसीलदार गणेश शिंदे यांच्याहस्ते कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार वाटप कार्यक्रमाची सुरवात करताना प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी.

शिराळा (विनायक गायकवाड) : प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी मोफत अंडी देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात शिराळा येथील प्रितीराज ऑफसेटचे मालक प्रताप कदम यांचे चिरंजीव राजदीप कदम (राणा) याच्या वाढदिवसाचा खर्च टाळून तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, प्रेस क्लब ऑफ शिराळा व मराठी पत्रकार संघ यांचे उपक्रम हे नेहमीच समाजिक हिताचे असतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देखील प्रेस क्लब ऑफ शिराळा यांच्या वतीने, रुग्णांना, नातेवाईकांना जेवण, लॉक डाऊन मध्ये अन्नधान्य किट वाटप, सरबत वाटप, कोरोना योध्दा सन्मानपत्र वाटप, स्वच्छता कामगार कौतुक सोहळा असे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते. याही वेळी समाजातील दानशूर मंडळींना एकत्र करून त्यांच्या मदतीने रुग्णांना अंडी व पौष्टिक आहार देण्याचा एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. समाजात पत्रकार म्हणून वावरत असताना सामाजिक कार्यामध्ये प्रेस क्लब ऑफ शिराळा व मराठी पत्रकार संघ शिराळा नेहमीच आघाडीवर आहेत.

यावेळी शिराळा ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र गायकवाड, डॉ. मयुरी राजमाने, दिनेश हसबनीस, शिवाजीराव चौगुले, विनायक गायकवाड, अजित महाजन, प्रीतम निकम, सचिन पाटील, विजय गराडे, मनोज मस्के, प्रताप कदम, विकास शहा, विठ्ठल नलवडे, शिराळा खुर्दचे सरपंच किरण पाटील, कॉन्ट्रॅक्टर बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments