Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सुंदरनगर येथील शोभा केंगार यांचे निधन

सांगली (प्रतिनिधी) : सुंदरनगर येथील वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या संचालिका शोभा आनंदा केंगार यांचे दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 55 वर्षाचे होते.

त्यांच्यावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुंदरनगर येथील वारांगना महिलांच्या विकासासाठी त्यांनी स्व. अमिराबी शेख यांच्या समवेत गेली अनेक वर्षे काम केले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 9 वाजता अमरधाम स्मशान भूमीत होणार आहे.

Post a Comment

0 Comments