Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी म्युकरमायकोसीसचे आढळले २९ रुग्ण

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसाचा आकडा नियंत्रणात येत असतानाच म्युकरमायकोसीसचे थैमान सुरु झाले आहे. आज रविवारी एकाच दिवशी म्युकरमायकोसीसचे २९ रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६० म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे. 

सांगली जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. आज रविवारी तर ८७२ इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आता म्युकरमायकोसीसने थैमान घालायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत १६० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील मृत्यूदर देखील नियंत्रणात आलेला नाही. आज ३५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

सद्या सांगली जिल्ह्यातील १२ हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरू असून आजअखेर जिल्ह्यातील १ लाख १ हजार ८८० रुग्णानी कोरोना वर मात केली आहे. तर एकूण ३४०१ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. आज दिवसभरात १ हजार २९२ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.

आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे आटपाडी ४३, जत ६७, कडेगाव ८३, कवठेमंहकाळ ४१, खानापूर ६४, मिरज ८७, पलूस ३८, शिराळा १११, तासगाव ११८, वाळवा ९९ तसेच सांगली शहर ७४, आणि मिरज शहर ४७ असे सांगली जिल्ह्यातील एकूण ८७२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

Post a Comment

0 Comments