Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड कोविड सेंटर मधील दोघे कोरोनामुक्त

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती व कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून उभारलेल्या कुपवाड कोविड केअर सेंटर मधून दोघांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
गेल्या दहा दिवसांच्या उपचारांनंतर अखेर यांना त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने काल डिस्चार्ज देण्यात आला. कुपवाड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. नीरज उबाळे ,नगरसेवक मा. प्रकाश ढंग यांच्याहस्ते रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कोविड सेंटर मधून निरोप घेताना दोघेही भावनिक झाले होते.

यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष मा. सनी धोतरे, उपाध्यक्ष प्रविण कोकरे,कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, सचिव विलास माळी, खजिनदार प्रकाश व्हनकडे, संचालक मोहनसिंग रजपूत,समीर मुजावर,राजेंद्र पवार,महावीर खोत,प्रकाश पाटील,रमेश भानूशाली,निलेश चौगुले,विजय खोत,बल्लू शाकला,बिरू आस्की,जितेंद्र कुंभार,महेश निमळे,श्रीकृष्ण कोकरे,करीम मुजावर,अशोक रास्कर,विनायक बलोलदार,भीमराव सरोदे,शक्ति सुतार,कुपवाड केअर सेंटर मधील डॉक्टर, नर्सेस स्टाफ,सर्व संचालक ,पदाधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments