Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सुरेश पाटील यांचे कार्य राज्यात आदर्शवत : मंत्री डाॅ. विश्वजीत कदम

सांगली (प्रतिनिधी) : श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद लेडीज होस्टेल चे अवघ्या ५ दिवसांत कोविड हॉस्पिटल मध्ये रूपांतर करण्याची किमया केली आहे. त्यांचे हे कार्य राज्यात आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे असे वक्तव्य कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
नेमिनाथनगर, सांगली येथे उभारण्यात आलेल्या श्री
भगवान महावीर कोविड हॉस्पिटलला मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते. मंत्री कदम म्हणाले, जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्था, दानशूर व्यक्तीने या संकट काळात आपल्या परीने सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे. समस्त जैन समाजातील दानशूर व्यक्तींनी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट संचलित भगवान महावीर हॉस्पिटल हे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणानी युक्त अशा ४० बेडसची सुविधा असलेल्या, या हॉस्पिटलमध्ये १५ बेड्स आयसीयु व्हेंटिलेटर व हायफ्लो नेझल युक्त तसेच २० ऑक्सिजन बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. सदरचे हॉस्पिटल सर्वसामान्य, गरजू नागरिकांना उपयूक्त ठरत असून, याचा आदर्श व पुढाकार समाजाने घेतल्यास कोरोनावर आपण लवकरच मात करू शकतो. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

याप्रसंगी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, विरोधी
पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, राजगोंडा पाटील वसंत पाटील, सुभाष देसाई व ट्रस्टची कार्यकर्ते हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments