Daily Mahasatta

Daily Mahasatta

मिरज येथील ट्रिमिक्स रस्ता कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

मिरज (प्रतिनिधी) : सा. मि. कु. शहर महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथील "हॉटेल किरण ते सुखनिवास ते रेल्वे स्थानक पर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स पद्धतीने काँक्रीटीकरण केलेल्या कामाचा शुभारंभ महापौर दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. सदरचे काम नागरोत्थान योजनेतील असून या कामाची अंदाजित रक्कम 2. 24 कोटी इतकी आहे. 

यावेळी महापौर सुर्यवंशी यांनी संबंधित ठेकेदाराला काम चांगल्या व दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्त्याकडेला असणाऱ्या प्रलंबित गटारीचा प्रश्न ही ताबडतोब मार्गी लावला व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगरसेवक अहतर नायकवडी, गणेश माळी, नगरसेविका संगीता खोत, अभिजीत हारगे, गजानन कल्लोळी, मनपा शहर अभियंता संजय देसाई, शाखा अभियंता बी. आर. पांडव आदी मनपा अधिकारी व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments