Daily Mahasatta

Daily Mahasatta

'त्या' ग्रीफॉन गिधाडाने केला 800 कि. मी चा प्रवास

इस्लामपूर (हैबत पाटील) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नुकतीच ग्रीफॉन या दुर्मिळ जातीच्या गिधाडाची नोंद झालेली होती. हे आलेले ग्रीफॉन गिधाड केरळ राज्यातून सुमारे ८०० किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आले असल्याची माहिती वन्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 

माहिती मध्ये त्यांनी पुढे सांगितले आहे की,
हे गिधाड जंगली जयगड परिसर कोयना अभयारण्य या ठिकाणी आढळून आले होते. हे युरेशियन प्रिफॉन गिधाड केरळ राज्यात कन्नूर जिल्ह्यातील चकरकल येथे एका घराच्या ठिकाणी 28 डिसेंम्बर रोजी दमलेल्या अवस्थेत सापडले होते. त्याला औषध उपचारासाठी वन्यजीव बाजाव विभागाकडे केरळ वन विभागाच्या वतीने ठेवण्यात आले होते. नंतर त्याच्यावर उपचार करून केरळ वन्य विभाग व पक्षी तज्ञ यांनी त्याच्या पायाला रिंग लावून व पंखाला नारंगी टॅग लाऊन त्याला बायनाड अभयारण्यात 31 जानेवारी ला निसर्गमुक्त केले . पक्षी अभ्यास व त्याच्या स्थलांतराच्या अभ्यासासाठी हा टॅग लावला जातो. त्याच्या डाव्या पायात रिंग व त्यावर 10 असा अंक असून पंखावर L8 असे लिहिण्यात आलेले आहे . असे कोयना वन विभागच्या वतीने सांगण्यात आले आहे. पुढे हा पक्षी केरळ मधेच घिरट्या घालत होता नंतर तो तामिळनाडू येथील कोईबतूर येथे एका पक्षी निरीक्षका ला दिसला होता. त्याने त्याचे छायाचित्र ही काढले होते. त्यानंतर हा 28 फेब्रुवारी ला हा पक्षी पुन्हा बाय नाड अभयारण्यात दिसला . पुन्हा तो पक्षी सह्याद्री व्याघ्रप्रकल्प मध्ये दिसला केरळ ते कोयना जंगली जयगड हे 800 की मी अंतर आहे . ते सध्या सह्याद्री कोयना अभयारण्यात आहे ही गिधाडे दक्षिण युरोप उत्तर आफ्रिका येथे प्रजनन करतात भारतात हे पक्षी उत्तर हिमालय इकडून स्थलांतरित होतात. 1990 पूर्वी या पक्षांची संख्या दिसून येत होती . गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर हा पक्षी सध्या नष्ट प्राय पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट आहे .

Post a Comment

0 Comments