Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात 62 रूग्णांचा बळी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात शनिवार ता.15 रोजी एकाच दिवशी 62 रूग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. तर आज दिवसभरात 1601 रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. रूग्ण संख्या घटत असली तरी रूग्णांच्या मृत्यूचा आकडा मात्र वाढत आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता अटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रूग्णांची संख्याया कायम आहे. आज शनिवारी जिल्हयात 1601 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. तर दिवसभरात जिल्हयात 62 रूग्णांचा मृत्यू झाला, यामध्ये सांगली जिल्ह्यातील 49 तर अन्य जिल्ह्यातील 13 रूग्णांचा समावेश आहे. सद्या 16 हजार 985 रूग्ण उपचाराखाली आहेत. तर आज 1573 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आज सांगली जिल्हयात तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढील प्रमाणे : आटपाडी-127, जत-273, कडेगाव -136, कवठेमंहकाळ-52, खानापूर 168, मिरज -190, पलूस-99, शिराळा -126, तासगाव -110, वाळवा-176, तसेच सांगली शहर- 92 आणि मिरज शहर -52 असे एकूण 1601 रूग्ण आज पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments