Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात 45 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात बुधवार ता.12 रोजी 1594 रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 45 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतात कोल्हापूर जिल्ह्यातील पाच रूग्णांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या
आता अटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रूग्णांची संख्या मात्र कायम आहे. आज बुधवारी जिल्हयात 1594 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. जिल्हयात कोरोनामुळे होणार्‍या मृत्युचा आकडा कायम आहे. आज दिवसभरात 45 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यात 7 तर वाळवा तालुक्यात 8 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच आज कोल्हापूर जिल्हयातील रूग्ण जे सांगली जिल्हयात उपचार घेत आहेत त्याच्यापैकी 5 रूग्णांचा उपचाराखाली मृत्यू झाला आहे.
 
सद्या 17 हजार 331 रूग्ण उपचाराखाली आहेत. तर आज 1299 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज सांगली जिल्हयात तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढील प्रमाणे ः आटपाडी-70, जत - 290, कडेगाव -73, कवठेमंहकाळ- 118, खानापूर 168, मिरज - 220, पलूस- 48, शिराळा - 75, तासगाव -170, वाळवा-195, तसेच सांगली शहर- 100 आणि मिरज शहर - 67 असे एकूण 1594 रूग्ण आज बुधवार ता.12 रोजी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments