Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात 43 रूग्णांचा बळी : परिस्थिती अजून नियंत्रणाबाहेर

सांगली (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोना वाढीचा वेग मंदावत असला तरी सांगली जिल्हयात मात्र अजूनही दररोज सरासरी दीड हजार नवीन रूग्ण आढळून येत आहेत. तर मृतांचा आकडा देखील अजून नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपत आल्यानंतर आता प्रशासनाची चिंता आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

सांगली जिल्ह्यात आज 1434 रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 43 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रूग्णसंख्या थोडीफार नियंत्रणात आल्याचे दिसत असले तरी मृत्यूचा आकडा कायम आहे. विशेष म्हणजे या दुसर्‍या लाटेत नागरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान सुरू असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत जिल्हयात 13 हजार 876 रूग्ण उपचाराखाली आहेत. तर दिवसभरात 1376 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे ः आटपाडी 58, जत 230, कवठेमंहकाळ 44, कडेगाव 88, खानापूर 85, मिरज 155, पलूस 68, शिराळा 125, तासगाव 162, वाळवा 250 तसेच सांगली शहर 102 आणि मिरज शहर 67 असे एकूण 1434 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत

Post a Comment

0 Comments