Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात 2614 कोरोना रूग्ण चिंताजनक

: रविवार दिवसभरात नवीन 1341 रूग्ण
सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात रविवार ता.9 रोजी एकाच दिवशी 1341 रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 58 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सद्यस्थितीत सांगली जिल्हयात 2614 रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कोरोना चाचणी मर्यादित होतात. त्यामुळे आज काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्हयात 1341 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. परंतू जिल्हयात कोरोनामुळे होणार्‍या मृत्युचा आकडा कायम आहे. आज दिवसभरात 58 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. खानापूर तालुक्यात सर्वाधिक 9 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. 

सद्या 16 हजार 968 रूग्ण उपचाराखाली आहेत. आज 1355 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज सांगली जिल्हयात तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढील प्रमाणे ः आटपाडी-125, जत-195, कडेगाव -72, कवठेमंहकाळ-80, खानापूर 123,मिरज -184, पलूस-52, शिराळा -38, तासगाव -119, वाळवा-152, तसेच सांगली शहर- 139 आणि मिरज शहर -62 असे एकूण 1341 रूग्ण आज रविवार ता.9 रोजी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments