Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात उच्चांकी1380 रूग्ण कोरोनामुक्त :  शनिवारी 1720 कोरोना पॉझिटीव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी उच्चांकी 1380 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज नवीन कोरोना रूग्ण वाढीचा वेग काहीसा मंदावला असून दिवसभरात 1720 नवीन रूग्ण आढळून आले. आज जत तालुक्यात सर्वाधिक 295 रूग्ण आढळून आले. तसेच वाळवा तालुक्यात एकाच दिवशी 11 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

सांगली जिल्हयात कोरोनाचे रूग्ण जसे वाढत आहेत, त्याचप्रमाणे आता कोरोनामुक्त होणारांची सं‘या देखील वाढत आहे. आज शनिवारी एकाच दिवशी 1380 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हयाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र धोका अजून टळलेला नाही. रूग्ण वाढ कायम असतानाच ऑक्सिजन, औषधे आणि लसींचा तुटवडा ही प्रशासना समोरील मुख्य समस्या ठरत आहे. तरी देखील प्रशासनाचा अखंड लढा सुरूच आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील रूग्ण वाढीला काहीसा ब्रेक लागल्यामुळे महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

आजअखेर 89 हजार 413 रूग्णांचा कोराना अहवाल पॉझिटीव्ह आला असून यापैकी 69 हजार 783 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 17 हजार 28 रूग्ण उपचाराखाली आहेत. तर 2 हजार 602 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. आज रोजी जिल्हयातील 2 हजार 641 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

आज सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे ः आटपाडी-114, जत-295, कडेगाव-104, कवठेमंहकाळ-114, खानापूर-162, 
मिरज-232, पलूस-103,शिराळा-67, तासगाव-159, वाळवा-184 तसेच महापालिका क्षेत्रातील सांगली शहर-105 आणि मिरज शहर-81 असे एकूण 1720 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत

Post a Comment

0 Comments