Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात 1373 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

ः मंगळवार दिवसभरात 39 जणांचा मृत्यु
सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात मंगळवार ता.11 रोजी 1373 रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 39 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

आज मंगळवार ता.11 रोजी जिल्हयात 1373 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. जिल्हयात कोरोनामुळे होणार्‍या मृत्युचा आकडा कायम आहे. आज दिवसभरात 39 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जत तालुक्यात सर्वाधिक 7 तर महापालिका क्षेत्रात 8 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सद्या 17 हजार 71 रूग्ण उपचाराखाली आहेत. आज 1265 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आज सांगली जिल्हयात तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढील प्रमाणे ः आटपाडी-115, जत-220, कडेगाव -78, कवठेमंहकाळ-59, खानापूर 101, मिरज -183, पलूस-95, शिराळा -59, तासगाव -137, वाळवा-158, तसेच सांगली शहर- 129 आणि मिरज शहर -39 असे एकूण 1373 रूग्ण आज मंगळवार ता.11 रोजी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments