Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे11 रूग्ण आढळले, एकाचा मृत्यू

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्हयात आता कोरोनानंतर म्युकरमायकोसीस या रोगाची एंट्री झाली आहे. आज शनिवार एकाच दिवशी जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे 11 रूग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत म्युकरमायकोसीसचे 72 रूग्ण आढळून आले असून यापैकी एका रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

राज्यभरात कोरोना वाढीचा वेग मंदावत असला तरी सांगली जिल्हयात मात्र अजूनही दररोज सरासरी दीड हजार नवीन रूग्ण आढळून येत आहेत. आज शनिवार ता.22 रोजी 1353 रूग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज उपचारादरम्यान आज 42 रूग्णांचा बळी गेला आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3148 रूग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आता म्युकरमायकोसीसचे रूग्ण आढळून येऊ लागल्यामुळे प्रशासनापुढे आणखी मोठे आवाहन निर्माण झाले आहे.

सांगली जिल्ह्यात रूग्णसं‘या थोडीफार नियंत्रणात आल्याचे दिसत असले तरी मृत्यूचा आकडा कायम आहे. जिल्ह्यात दररोज चाळीस पेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने बळी जात आहे. तर आज 1329 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सांगली जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या 2273 रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आज सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी 94, जत 170, कडेगाव 100,  कवठेमंहकाळ 106, खानापूर 103, मिरज 171, पलूस 63, शिराळा 72, तासगाव 104, वाळवा 170 तसेच सांगली शहर 139 आणि मिरज शहर 61 असे एकूण 1353 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments