Daily Mahasatta

Daily Mahasatta

Good news सांगली जिल्ह्यात ९३५ रुग्णांची कोरोनावर मात

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात कोरोना चा कहर सातत्याने सुरुच असून आज उपचारादरम्यान ५१ रुग्णांचा बळी गेला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ४० आणि अन्य जिल्ह्यातील ११ मृतांचा समावेश आहे. आज दिवसभरात १ हजार १४१ नवीन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. असे असले तरी आज दिवसभरात ९३५ इतक्या उच्चांकी रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांचा आकडा सुमारे अकराशे च्या आसपास स्थिरावल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. आज सोमवार ता. २६ रोजी जिल्ह्यात १ हजार १४१ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर सर्वाधिक ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील ६, वाळवा तालुक्यातील ८ आणि महापालिका क्षेत्रातील ११ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

आज सांगली जिल्ह्यात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ५४ , जत १२७, कडेगाव ११४ , कवठेमंहकाळ ६९ , खानापूर ९४, मिरज १९५, पलूस ७० , शिराळा ५३ , तासगाव ६४, वाळवा १३२, तसेच सांगली शहर ११३ आणि मिरज शहर ५६ असा सांगली जिल्ह्यातील १ हजार १४१ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ११ हजार ५४४ रुग्ण उपचाराखाली आहेत.
-------------------------------


Post a Comment

0 Comments