Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलुस परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा, घरावरील व गोट्यावरील पत्रे उडाले

पलुस (अमर मुल्ला) : रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा नागरिक व शेतकरी यांना बसला. झाडांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी फांद्या तुटलेल्या तर काही ठिकाणी झाडे पडली.

वादळी वार्‍याच्या तडाख्याने पलूस तालुक्यातील मोराळे गावात मळ्यात राहणारे निशांत उद्धव पाटील यांच्या राहत्या घरावरील पत्र्याची पाने उडाली आहेत. तसेच जनावरांच्या गोट्यावरचा पत्राही या वाऱ्याने उडाला आहे. यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. या नुकसानीचा पंचनामा करून प्रशासनाकडून नुकसान भरपाईच्या मदतीची मागणी होत आहे.

वादळी वाऱ्याच्या सुरुवातीला खबरदारी म्हणून महावितरण कडून वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या तुफानी वाऱ्यामुळे मोराळे गावात विद्युत तारेचा खांब कोसळला . त्यामुळे विद्युत तारा तुटलेल्या आहेत. बांबवडे गावातही विद्युत तारा तुटल्या आहेत. महावितरणने वेळीच विद्युत पुरवठा बंद ठेवल्याने विद्युत वाहिनीतून होणाऱा प्रवाह बंद असल्याने होणारी हानी टळली.

अती उष्ण तापमानामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांचे व शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा भंग झाला. विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाट एवढा भयंकर होता की मोठा पाऊस पडणार असेच वातावरण निर्माण झाले होते. परंतु वादळी वाऱ्यामुळे पाऊस कमी प्रमाणात झाला . शेतकऱ्यांना या वादळी वाऱ्याचा फटका बसला व आर्थिक नुकसान झाले.

Post a Comment

0 Comments