Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाडात अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

कुपवाड (प्रतिनिधी) : कुपवाड परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कुपवाड परिसरातील औधोगिक वसाहती मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावत आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी रुद्रप्रताप नंदकुमार करांडे याने त्या अल्पवयीन मुलीस पळवून नेले असल्याची तक्रार त्या मुलीच्या वडिलांनी दिली आहे. या गुह्यचा अधिक तपास पो. काॅ. गव्हाणे करीत आहेत.

Post a comment

0 Comments