Daily Mahasatta

Daily Mahasatta

आशा होमिओपॅथी ' टीम 'कडून आयुष मंत्र्यांची सांत्वनपर भेट

गोवा : आशा होमिओपॅथीचे डॉ. बी. एस. भोसले यांनी सहकाऱ्यांसह गोवा येथे केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले

मिरज (प्रतिनिधी)  : कोरोना काळात होमिओपॅथी उपचार पद्धती प्रभावी ठरत असल्याने आता खऱ्या अर्थाने होमिओपॅथी उपचार पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी ना. नाईक यांचे कुटुंबियांसमवेत अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पत्नी आणि स्वीय सहाय्यकाचा मृत्यू झाला होता. अश्या दुःखाच्या प्रसंगातही देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारे मंत्री पाहून आशा होमिओपॅथी टीम भारावून गेली.

काही दिवसांपूर्वी ना. नाईक यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात ते स्वत: गंभीर जखमी झाले होते. तसेच त्यांच्या पत्नी व स्वीय सहाय्यक यांचा मृत्यू झाला होता. आशा ग्रुप ऑफ़ होमिओपॅथी,मिरज चे संचालक मा. डॉ. बी. एस्. भोसले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतेच गोवा येथे ना. नाईक यांच्या निवासस्थानी त्यांची सांत्वनपर भेट घेतली. 

डॉ. भोसले यांनी ना. "नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन आरोग्याची काळजी घेण्याची विनंती केली. देशात पुन्हा नव्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत ना. नाईक यांनी चिंता व्यक्त केली. कोरोनाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती प्रभावी ठरत असल्याने होमिओपॅथी उपचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही देशाची काळजी करणारे मंत्री पाहून आशा होमिओपॅथी टीम भारावून गेली. 

यावेळी डॉ. प्रविण पाटील, डॉ. सौ. शैली शर्मा-भोसले, डॉ. अर्चना पाटील, डॉ. गुरुदास नाईक, डॉ. प्रिया कामत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments