Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनावरील लस अत्यंत प्रभावी : आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली (प्रतिनिधी) : कोरोनावरील लस अत्यंत प्रभावी आहे. सर्व नागरिकांनी लस घेऊन कोरोनापासून आपला बचाव करावा असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले. आ. गाडगीळ यांनी सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सांगली सिव्हिल ) मध्ये रविवारी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. 

ते म्हणाले, कोरोनावरील लस अत्यंत प्रभावी आहे. लसीकरणाचे दोन्हीही डोस पूर्ण झाल्यानंतर केवळ ०.०२ ते ०.४ टक्के लोकांनाच काहीसा त्रास झाला असल्याचे समजते. पहिला डॉस झाल्यानंतर ४५ दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. अनेकांना याचा अजिबात त्रास झालेलाच नाही. सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो आहे. यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना पासून आपला बचाव करावा. दुसऱ्या डोससाठी पात्र असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी ही लस घ्यावी. येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वानाच कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून लस घ्यावी असेही आवाहन आ. गाडगीळ यांनी केले. यावेळी रुग्णालयातील डॉ रविकांत राठोड, डॉ. प्रफुल हुलके, स्टाफ नर्स अंजली वेदपाठक, अश्विनी व विद्या पाटोळे आदी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments