Daily Mahasatta

Daily Mahasatta

राष्ट्रवादीच्या ' त्या ' व्हाईट कॉलर नगरसेवकाला मोका लावा : वैभव पवार यांची मागणी

इस्लामपुर (हैबत पाटील) : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणासाठी आणलेल्या स्टोन सुध्दा स्वत:च्या घराच्या सुशोभिकरणासाठी पळविला, कारागिरांना नाहक त्रास दिला, सुशोभिकरणाचे काम रेंगाळत पाडले, अव्वाच्यासव्वा खर्च करुन ही हे काम पुर्णत्वाकडे गेले नाही, मात्र विकास आघाडीने हेच काम पुर्ण करुन शहराच्या विकासात व विचारात भर घातली आहे व शहरवासियांच्या अपुरे स्वप्न पुर्ण केले. यामुळे राष्ट्रवादीची खर्‍या अर्थाने पोटदुखी वाढली आहे. यातुनच नागरीकांची दिशाभुल करण्याचा त्यांचा खटाटोप सुरु असल्याचा पलटवार विकास आघाडीचे उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक वैभव पवार (दादा) यांनी केला.

यावेळी बोलताना वैभव पवार पुढे म्हणाले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणाचे काम राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सुरु झाले. मात्र हे काम त्यांना पुर्णत्वास नेता आले नाही. कारण सुशोभिकरणासाठी आणलेला स्टोन राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने स्वत:च्या घराच्या सुशोभिकरणासाठी पळविला व सुशोभिकरणाचे काम रखडले. या स्टोनची पळवापळवी कोणी केली ही कोणत्या ज्योतीषाने सांगायची गरज नाही. या वरुन राष्ट्रवादी च्या सत्ताधारी नगरसेवकांच्यात संघर्ष पेटला होता. या संघर्षातच सुशोभिकरणाचे काम रखडले., परराज्यातील आलेल्या कामगारांना ही दहशत दाखवुन परती चा मार्ग दाखविणारे ही याच राष्ट्रवादी टोळीतील व्हाॅईट काॅलर दहशत माजविणारे बहाद्दर आहेत. 

या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने स्टोनची पळवापळवी करत, कारागिरांवर दहशतीचा धाक दाखवत पुतळा सुशोभिकरणाचे काम विद्रुप अवस्थेत ठेवले व शहरवासियांची निराशा केली. यावरुन खर्‍या अर्थाने राष्ट्रवादीनेच महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची सुशोभिकरणाच्या कामाची हेळसांड केली आहे. राष्ट्रवादीने विकास आघाडीवर केलेले आरोप हे निव्वळ स्टंटबाजी व शहरवासियांची दिशाभुल करण्यासाठी केलेला हास्यास्पद नाटयप्रयोग आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशोभिकरणासाठी परराज्यातुन आणलेला स्टोन कोणी कोणाच्या घराच्या सुशोभिकरणासाठी वापरला हे शहाजी पाटील यांना व शहराला माहीती आहे. ज्यांनी खर्‍या अर्थाने विद्रुप अवस्थेतील कामाचे सुशोभिकरण केले त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार्‍यांनी स्टोन ची पळवापळवी करणार्‍याची चौकशी करुन त्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शहाजी पाटील यांनी करावी म्हणजे राष्ट्रवादी च्या ही अनेक पदाधिकार्‍यांचे समाधान होईल. संबधितांच्यावर यापुर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मोकाअंतर्गत कारवाई निश्चीत होईल असा विश्वास वैभव पवार यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments