Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांची थेट कोरोनाग्रस्तांच्या वाॅर्डात एंट्री, पहा काय म्हणाले डाॅ. विश्वजीत

कडेगाव (सचिन मोहिते ) : आरोग्य विभागात पीपीई किट घालून काम करणारे डॉक्टर हेच देवदूत आहेत, असे मत महाराष्ट्र राज्याचे कृषीराज्य मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये थेट कोरोना वॉर्डात जाऊन डॉक्टर, नर्सेस आणि पेशंट समवेत संवाद साधला होता . साधारण ४० ते ४५ मिनिटे या वॉर्डात पीपीई किट घालून होते. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले .

महाराष्ट्रासह देशातील कोरोणाचे संकट भयावह होत चालले आहे . कोरोणाच्या काळात प्रत्येकजण एकमेकासाठी आपआपल्या परिने जमेल तशी मदत करत आहेत . तर काहि राजकारणी एकमेकावर टिका टिपण्णी करण्यात व्यस्त आहेत. परंतु याला कडेगाव पलुस मतदार संघाचे आमदार व कृषी राज्यमंत्री डॉ . विश्वजीत कदम याला अपवाद ठरत आहेत . कारण याची प्रचिती भारती हॉस्पीटल येथे भेट दिल्यावर आली.

यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले की, कोरोना संसर्गाविरोधातील युद्धामध्ये प्रयत्नांची शर्थ करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सेवकांना कोरोनायोद्धे का म्हणतात, याचा प्रत्यय आपल्याला युद्धभूमीवर, प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर येतो कालचा अनुभव अजूनही माझ्या मनात घर करून आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये थेट कोरोना वॉर्डात जाऊन डॉक्टर, नर्सेस आणि पेशंटसमवेत संवाद साधला. साधारण ४० ते ४५ मिनिटे या वॉर्डात मी पीपीई किट घालून होतो. अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी अवस्था होत होती. मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मग या रुग्णांची सेवा करताना बारा-बारा तास पीपीई किट घालून हे कोरोना योद्धे कसे काम करत असतील, याची कल्पनाच केलेली बरी .

कुणाच्या घरी चिमुकली आपल्या आईची वाट पाहत असेल, तर कोणाचे कुटुंबीय काळजीने त्रस्त असतील. पण, या कोरोना विरोधातील लढाईत स्वतःच्या जिवाची, परिवाराची तमा न बाळगता या डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे सेवाकार्य गेले वर्षभर अथकपणे सुरू आहे. भारती हॉस्पिटल व वैद्यकीय सेवांचे जाळे उभारताना आपल्या स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेबांनी सर्वसामान्य जनतेच्या सेवेचा संस्कार दिला होता. आज पीपीई किटमधील देवदूत हाच जनसेवेचा वसा मनोभावे आचरत आहेत. त्यांच्या कार्याला माझा पुन्हा एकदा मनापासून सलाम. जनसेवेच्या या संस्काराला सर्वतोपरीने पुढे नेण्याचा, त्याला पाठबळ देण्याचा निर्धार मीदेखील या निमित्ताने पुन्हा व्यक्त करतो असे ते म्हणाले .

Post a Comment

0 Comments