Daily Mahasatta

Daily Mahasatta

मिरजेत कौ. जोतिराम मेथे कोविड सेंटरचे उद्घाटन संपन्न

मिरज (प्रतिनिधी) : मिरजेतील बाजार समिती आवारातील शेतकरी भवन येथे डॉ.पृथ्वीराज मेथे यांच्या ब्रीदवेल हॉस्पिटल संचलित कै. ज्योतिराम मेथे मेमोरिअल कोविड सेंटरचे उद्घाटन कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. येथे उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत श्वसनविकारतज्ञ डॉ. पृथ्वीराज मेथे यांनी उपस्थितांना माहिती दिली. या कोविड केंद्राचा गरजू रुग्णांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास महापौर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.  

यावेळी माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र मेथे, संजय मेथे, प्रकाश सुरवसे, जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. मिरज आणि सांगलीसह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपचाराची साधने उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून मिरज येथील श्वसनविकारतज्ञ डॉ. पृथ्वीराज मेथे यांनी कोविड सेंटर सुरु केले आहे. डॉ मेथे यांचे ब्रिटव्हेल हॉस्पिटल, हे नॉन कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे. गत वर्षी कोरोना साथीच्या काळात डॉ. मेथे यांनी त्यांच्या रुग्णालयात आणि शहरातील विविध रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. 

मिरजेतील बाजार समिती आवारातील शेतकरी भवन येथे सुरु केलेल्या कोविड केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे ऑक्सिजनचे 37 खाट उपलब्ध आहेत. रुग्णांवर उपचारांसाठी तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी येथे असणार आहेत. डॉ. मेथे यांनी कोरोना साथीच्या काळात केलेल्या कार्याचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले.अत्यंत हुशार व अग्रेसिव्ह ट्रिटमेंट करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच येथील कोविड केंद्राचा गरजू रुग्णांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह उपस्थितांनी व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments