Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका "आपत्ती व्यवस्थापन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यात प्रस्ताव सादर करण्यात आले होते. चार टप्प्यातील प्रक्रियेनंतर 30 एप्रिल रोजी याची घोषणा करण्यात आली.

सदरच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी स्कॉच या संस्थेकडे सुरवातीला महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा प्रस्ताव सादर केला होता. यामधून पहिल्या टप्प्यात दोनशेहून अधिक प्रस्तावामधून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पहिल्या टप्प्यात निवड झाली. त्यानंतर स्कॉचकडून प्रश्नावलीद्वारे परिक्षण करण्यात आले. यामध्ये पात्र ठरल्यावर स्कॉचकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन परीक्षा घेणेत आली. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीचे समनव्यक अधिकारी इरफान चौगुले यांनी संपूर्ण माहिती दिली. यामध्येही महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष पात्र झाल्यावर संबंधित स्कॉच संस्थेकडून मतदान घेतले. यामध्येही महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष पात्र झाले. 

यानंतर आपल्या प्रकल्पाबाबत महापालिकेने युट्युबला दाखल केलेल्या इमेजला आलेल्या प्रतिसादानंतर 30 एप्रिलला पुन्हा एकदा ऑनलाईन कॉन्फरन्समध्ये चर्चा झाल्यानंतर स्कॉच या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला स्कॉच पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे , विशेष कार्य अधिकारी सतीश सावंत यांच्या सूचनेनुसार समनव्यक अधिकारी इरफान चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments