Daily Mahasatta

Daily Mahasatta

आटपाडीचे शंभर वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करा

: सादिक खाटीक यांचे खासदार श्रीनिवास पाटील यांना साकडे

आटपाडी (प्रतिनिधी) : कराड -विटा - आटपाडी मार्गे गुहागर - पंढरपूर हा नवा रेल्वे मार्ग आणि बारामती - विजयपूर ( विजापूर ) हा आटपाडी मार्गे आणखी एक नवा रेल्वे मार्ग असे दोन नवे रेल्वे मार्ग अस्तित्वात आणत शतकापासूनचे आटपाडीचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते साताराचे खासदार श्री .श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली आहे .

खासदार श्रीनिवास पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्यांना पाठविलेल्या ईमेल पत्राद्वारे या अत्यंत महत्वाच्या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधत सादिक खाटीक यांनी, माणदेशी आटपाडी, खानापूर ,माण, खटाव या तालुक्यातील हजारो बांधव गलाई व्यवसायाच्या निमित्ताने भारतातील सर्व राज्ये, सर्व शहरांमध्ये विखुरलेले आहेत . शेजारच्या काही राष्ट्रातही या व्यवसायासाठी शेकडो माणदेशी बांधव कार्यरत आहेत . मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये हमालीसाठी, सुरत, मुंबई,अहमदाबाद, इचलकरंजी इत्पादी शहरांमध्ये कापड व्यवसायात असणाऱ्या माणदेशीची संख्या मोठी आहे . माणदेशी डाळींब, बोर, द्राक्षे ही जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवू लागली आहेत . उत्कृष्ट चवीच्या, सर्वोतम दर्जाच्या, निरोगी, चपळ, शेळ्या, मेंढ्या , बोकडे ,बकऱ्यांच्या मांसाने महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, कोल्हापूर ,सातारा, सोलापूर ,उस्मानाबाद कर्नाटकातील विजयपूर, ( विजापूर )हुबळी, बेंगलोर, मेंगलोर, चित्रदुर्ग, शिमोगा, बेळगांव, आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांसह तेलंगणातील हैद्राबाद इत्यादी ठिकाणच्या मटन खवय्यांना भुरळ पाडली आहे . 

Post a Comment

0 Comments