Daily Mahasatta

Daily Mahasatta

रावसाहेब पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ हजारांचा निधी जमा

सांगली : दक्षिण भारत जैन सभेतर्फे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी ५१ हजारांचा धनादेश काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. 

सांगली (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाची तीव्रता खंडीत व्हावी म्हणून शासनाने भ. महावीर जयंती सोशल डिस्टशिंगचे पालन करुन जनतेने घरीच साजरी करावी असे आवाहन केले होते. 

शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दक्षिण भारत जैन सभेतर्फे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी समस्त जैन समाजाने आपापल्या घरीच भगवान महावीर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापल्या घरी पंचामृत अभिषेक, प्रतिमा पूजन आणि अष्टक घालून भगवान महावीर जयंती साजरी केली.
रावसाहेब पाटील यांनी आज त्यांच्या स्वदेशी या निवासस्थानी पंचामृत अभिषेक करुन अष्टक घालून भक्तिभावाने भ. महावीर जयंती साजरी केली. त्यांनी भ. महावीर जयंतीच्या निमित्ताने शासनाच्या कोविड प्रतिबंधक कार्यास हातभार म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु. ५१ हजाराच्या मदतीचा धनादेश सांगली जिल्हा शहर कॉंग्रेस अध्यक्ष मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांचेकडे सोपविला.

भगवान महावीरांनी जगा व जगू द्या हा संदेश दिला. कोरोना महामारीत शासन जनतेला सर्वतोपरी मदत करीत आहे. या कार्यास हातभार लागावा म्हणून पाटील कुटुंबियांनी केलेली मदत हे खरे धर्मकार्य होय. महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा हा रचनात्मक उपक्रम अनुकरणीय आहे. शासनाच्या वतीने मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जैन समाजाने जयंती उत्सव घरीच साजरा केला व यानिमित्ताने रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भरीव मदत केली त्या बद्दल पाटील कुटुंबिय व जैन समाजाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments