Daily Mahasatta

Daily Mahasatta

आळसंदच्या समर्थ प्रतिष्ठानने जोपासली सामाजिक बांधिलकी

विटा (प्रतिनिधी) : कोरोनाच्या भीषण संकटात राज्यभरात रक्ताचा मोठा तुडवडा जाणवत आहे. वेळेत रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राण देखील गमवावा लागला आहे. अशा विपरीत परिस्थितीत आळसंद येथील समर्थ प्रतिष्ठानने सुमारे ५२ बाटल्या रक्त संकलित करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आज १४ रोजी श्री. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समर्थ प्रतिष्ठान आळसंद च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले. सध्या कोरोना महामारी च्या परिस्थिती मध्ये राज्यात रक्त तुटवडा असल्यामुळे गावातील तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान शिबीर राबविलेली. त्याप्रसंगी आळसंद गावचे सरपंच सौ. इंदुमती शहाजीराव जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील गणेश शेटे व तंटामुक्ती अध्यक्ष विकास मोरे, धनाजी जाधव, भरत हारुगडे, अमोल जाधव खंडेराव जाधव, श्रीरंग शिरतोडे, दौलत जाधव, सुधाकर नरुले, सुरेश हारुगडे, महेश बनसोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐन कोरोनाच्या भीषण संकटात समर्थ प्रतिष्ठानने राबविलेला रक्तदानाचा उपक्रम समाजाला मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार सरपंच इंदुमती जाधव यांनी याप्रसंगी काढले.

Post a Comment

0 Comments