Daily Mahasatta

Daily Mahasatta

जिल्हांतर्गत बदल्यांची पूर्वतयारी सुरू करा : शिक्षक संघाची मागणी

सागंली (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्याचे नवीन बदली धोरण निश्चित झाले असून तसा शासन निर्णय 7 एप्रिल 2021 रोजी निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्याची पूर्वतयारी सुरू करा अशा पद्धतीचे मागणी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक व विस्ताराधिकारी पदे भरण्यासाठी पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी अशीही विनंती करण्यात आली.

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या या नवीन शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे ,प्रशिक्षण देणे ,शाळा निहाय रिक्त जागा घोषित करणे ,शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे अशा अनेक कामांची पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे. सदर बदल्या 1 मे ते 31 मे या कालावधीत करण्यात येतील असे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णयात बदल्या संदर्भात निश्चित केलेला कालावधी लक्षात घेता प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी करावी लागणारी पूर्वतयारी तात्काळ सुरू होणे गरजेचे असल्याने शासन निर्णयातील मार्गदर्शना नुसार जिल्हांतर्गत बदल्यांची पूर्वतयारी सुरु करावी अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे ,मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली.

शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे लेखी आदेश काढले असून बदल्या संदर्भाची पूर्वतयारी लवकरच सुरू होईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला सांगितले.

यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष अमोल माने, सरचिटणीस राहुल पाटणे, जिल्हा उपाध्यक्ष महेश चौगुले ,विजय साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments