Daily Mahasatta

Daily Mahasatta

रविकिरण बेडके यांची सोशल मीडिया प्रमुख पदी निवड

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ ता. वाळवा येथील रविकिरण बेडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या पेठ जिल्हा परिषद गट प्रमुख पदी निवड करण्यात आली.

या निवडी प्रसंगी युवा नेते प्रतीक जयंतराव पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजयबापू पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील(बापू), जि. म. बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संग्रामदादा पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे वाळवा तालुकाध्यक्ष संजयबापू पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, दूध संघाचे संचालक संग्रामसिंह फडतरे, कारखान्याचे संचालक माणिक शेळके, आष्टा युवक अध्यक्ष शिवाजी चोरमुले, सोशल मीडिया कोअर कमिटीचे सर्व पदाधिकारी व वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी सोशल मीडियाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments