Daily Mahasatta

Daily Mahasatta

आत्मशक्ती पतसंस्थेकडून पाडव्यानिमित्त दुचाकी वाटप

पेठ (रियाज मुल्ला) : पेठ ता. वाळवा येथील आत्मशक्त्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी  पतसंस्थेकडून गुढीपाडव्या निमित्त दुचाकी वाहन वितरण करण्यात आले.

पेठ येथील मुख्य शाखेच्या वतीने सतिश सर्जेराव खोत रा.माणिकवाडी  व  शेडगेवाडी शाखेच्या वतीने  अनिकेत हणमंत पेठकर रा.पेठ यांना  स्पेलंडर प्लस या दोन गाड्यांचे वितरण संस्थेचे चेअरमन  हंबीरराव पाटील,संचालक एम.एस.पाटील,डॉ.संजय पाटील ,डॉ.मुसाअल्ली जमादार व  धनपाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आत्मशक्ती पतसंस्थेचे  जनरल मॅनेजर संजय दाभोळे, असि.जनरल मँनेजर  सुरेश पाटील, पेठचे शाखेचे AGM रमेश पाटील , शेडगेवाडी शाखेचे ब्रँच मँनेजर  प्रमोद पेठकर , व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments