Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात निवृत्त एसटी अधिकाऱ्याचे निधन

विटा (प्रतिनिधी) : चिखलहोळ येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सहदेव धुमाळ (वय 78) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दुपारी निधन झाले. आप्पा या नावाने ते परिचित होते. विटा येथिल पत्रकार प्रविण धुमाळ यांचे ते वडील होत. 

विटा एस टी आगारात अधिकारी पदावर त्यांनी अत्यंत प्रामाणिक व दीर्घकाळ सेवा बजावली. एस टी महामंडळात कामगारांचे नेते म्हणून ते परिचित होते. कामगारांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी ते नेहमीच अग्रहक्काने सहभागी होत असत. धार्मिक वृत्तीच्या धुमाळ यांना कलेची व भजनाची प्रचंड आवड होती. अनेक सामाजिक, धार्मिक व सहकारी संस्थांचा त्यांचा निकटचा संबंध होता. शेती क्षेत्राचीही त्यांना आवड होती. विविध सामाजिक कार्यात ते हिरिरीने सहभागी होत. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली विटा येथिल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी , सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे

Post a Comment

0 Comments