Daily Mahasatta

Daily Mahasatta

नियम मोडणारांवर कठोर कारवाई : पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम

कडेगाव (सचिन मोहिते) : दिक्षीत गेडाम, पोलीस अधिक्षक सांगली यांनी कोव्हिड- १९ अनुषंगाने कडेगाव पोलीस ठाणेस भेट दिली. सदर भेटीदरम्यान तालुक्यातील सर्व कोविड विभागाच्या अधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड - १९ च्या अनुषंगाने आढावा बैठक घेणेत आली. सदर बैठकीमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी समन्वय ठेवून काम करावे. लसीकरण केंद्र मोहिम जास्तीत जास्त ठिकाणी सुरु करावी, कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवुन जास्तीत जास्त लोकांची चाचणी करुन पॉझिटिव्ह रुग्णांना योग्य उपचार दिले जावेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये, संचारबंदीचे तसेच मा. जिल्हाधिकारी सो सांगली यांचे कोविड १९ चे अनुषंगाने दिलेल्या सुचनांचे पालन न करणारे यांचेवर कठोर व कडक कारवाई करावी तसेच विनामास्क फिरणारे, कारण नसताना फिरणारे लोकांचेवर योग्य ती कारवाई करावी याबाबत सर्व प्रशासकीय अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील कोरोना तालुका परिस्थितीचा आढावा घेतला. 
सदर आढावा बैठकीस मा. उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग कडेगाव श्री गणेश मरकड , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्री अंकुश इंगळे , मा. तहसिलदार कडेगाव शैलेजा पाटील , मा. पोलीस निरीक्षक कडेगाव पोलीस ठाणे पांडूरंग भोपळे , मा. सहा. पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे , मा. सहा. पोलीस निरीक्षक चिंचणी वांगी पोलीस ठाणे संतोष गोसावी , गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव दाजी दाईगडे , तालुका आरोग्य अधिकारी आशा चौगुले, मेडीकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय कडेगाव डॉ. कालेकर, मेडीकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय चिंचणी वांगी डॉ. शृंगारपुरे , कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप हजर होते. तसेच सदर भेटीदरम्यान सांगली सातारा जिल्हा हददीवर असलेल्या चेक नाक्यास भेट देवून चेक नाक्यावरील कर्तव्यावरील कर्मचारी यांचेकडुन अडी अडचणी उपलब्ध सुविधाबाबत विचारपुस करुन घेवुन योग्य त्या मार्गदर्शक सुचना दिल्या.

Post a Comment

0 Comments