Daily Mahasatta

Daily Mahasatta

'शिवप्रताप ' चा १५० कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण : विठ्ठल साळुंखे

विटा (प्रतिनिधी) : येथील प्रतिथयश शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी को ऑप. क्रेडीट सोसायटीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर १५० कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखेयांनी दिली आहे.

यावेळी बोलताना कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, खरे तर आर्थिक वर्षा अखेर म्हणजे ३१ मार्चलाच उद्दिष्ट पूर्ण झालेलं असत. पण नैसर्गिक वाढीवर विश्वास असलेने कोणतेही उद्दिष्ट ओढून ताणून आम्ही पूर्ण करत नाही. परंतु आजच्या पाडव्याच्या मुहूर्तावर १५० कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. केवळ १९ वर्षात एवढी मोठी गरुड झेप हि केवळ सभासदांचा संस्थेवर असणारा उदंड विश्वासामुळेच शक्य आहे. संस्थेचे कर्मचारी, पिग्मी एजंट हे आपुलकीने सेवा देतात. संचालक मंडळ पारदर्शक व गतिमान कारभार करतात. आणि या सर्वांची पोहच म्हणून आज १५० कोटी वरती मजल मारता आली आहे. या बरोबर संस्थेची उलाढाल २६० कोटींच्या वर गेली आहे. 

संस्थेच्या एकूण १३ शाखा कार्यरत आहे. नव्याने अथणी (कर्नाटक), भाळवणी (विटा) येथे लवकरच सुरू होतील. संस्थेच्या स्व मालकीच्या वास्तूचे कामकाज प्रगती पथावर असून पुढील वर्षी स्वतः चे वास्तूत कामकाज सुरू होईल. संस्थेने चालू वर्षी छोट्या कर्जावर भर दिला असून मायक्रो फायनान्स मध्ये मोठ्या प्रमाणा त काम करनेचे ठरले आहे. जेणे करून तळा गाळा पर्यंत त्याचा प्रभाव दिसून अर्थ चक्र गतिमान होईल .या बरोबरच संस्थेच्या ठेवी १५० कोटी ५० लाख, कर्जे ११० कोटी९४ लाख,गुंतवणूक ५६ कोटी ३१ लाख, खेळते भांडवल १६२ कोटी ५९ लाख,स्वभांडवल ४कोटी २ लाख, नफा १कोटी ५१ लाख,ऑडिट वर्ग अ अशी सांपत्तिक स्थिती आहे

Post a Comment

0 Comments