Daily Mahasatta

Daily Mahasatta

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तालुकाध्यक्ष पदी सौ. लक्ष्मी काळे


महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सांगली जिल्हा महिला आघाडीच्या तासगाव तालुका अध्यक्षपदी सौ. लक्ष्मी चंद्रकांत काळे तर सांगली जिल्हा विद्यार्थी संघटना सदस्य पदी सौरभ सुखदेव काळे यांची निवड


तासगाव (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सांगली जिल्हा महिला आघाडीच्या तासगाव तालुका अध्यक्षपदी
सौ. लक्ष्मी चंद्रकांत काळे (रा. मणेराजुरी) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महिला आघाडीच्या अध्यक्षा मा. उषा गायकवाड यांनी दिली आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील खेडोपड्यातून नाभिक समाजाची संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. आज शुक्रवार ता. २ रोजी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे नाभिक महामंडळाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत महिला आघाडीच्या तासगाव तालुका अध्यक्षपदी सौ. लक्ष्मी चंद्रकांत काळे (रा. मणेराजुरी) यांची निवड करण्यात आली. तसेच सांगली जिल्हा विद्यार्थी संघटना सदस्य पदी सौरभ सुखदेव काळे यांची निवड करण्यात आली. 

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, सांगली जिल्हा महिला अध्यक्ष उषा गायकवाड, जिल्हा सचिव मधुकर गायकवाड, तासगाव तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष तेजस सन्मुख, वीर शिवा काशिद नाभिक मंडळ मणेराजुरीचे सर्व सभासद उपस्थित होते. प्रा. सोमनाथ साळुंखे, मा. उषा गायकवाड यांच्या हस्ते नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments