Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत कॉंग्रेसतर्फे महारक्तदान शिबिर : पृथ्वीराज पाटील

सांगली, (प्रतिनिधी) वाढत्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन, तसेच घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ रोजी काँग्रेस भवनमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. कॉंग्रेस भवनात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणाऱ्या या रक्तदान शिबिरात कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
-

Post a comment

0 Comments