Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा पालिकेवर महिलांचा हल्लाबोल, तीव्र आंदोलनाचा इशारा

 

आमच्याकडून पाणीपट्टी, घरपट्टी सक्तीने वसुली केली जात आहे. परंतु सुविधा मात्र दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी या रहिवाशांनी केल्या. विटा येथील सर्वच भागात गेले काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

विटा (प्रतिनिधी) : अपुरा पाणीपुरवठा, वाढते घाणीचे साम्राज्य यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, कोव्हीड सारख्या महाभयंकर आजाराला हे एकप्रकारे निमंत्रणच असुन यासाठी सर्वस्वी विटा नगरपालिका जबाबदार आहे त्यामुळे आज विटा येथील मुल्ला गल्ली मधील महिलांनी विटा नगरपालिकेवर हल्लाबोल करून जाब विचारला

आमच्याकडून पाणीपट्टी, घरपट्टी सक्तीने वसुली केली जात आहे. परंतु सुविधा मात्र दिल्या जात नाहीत अशा तक्रारी या रहिवाशांनी केल्या. विटा येथील सर्वच भागात गेले काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यातही तीव्र पाणीटंचाई भासत आहे त्यावर संतप्त झालेल्या मुल्ला गल्लीतील काही महिला व नागरिकांनी याबाबत थेट नगरपालिकेत जाऊन प्रशासनाला जाब विचारला, याबाबत मागे एकदा तक्रारी अर्ज दिला होता. परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. 

आज नगरपालिका 365 दिवसांचे विज पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करत आहे आणि पाणी पुरवठा मात्र निम्म्या दिवसांचा म्हणजे 180 दिवसांचा देखिल केला जात नाही, घरपट्टी सक्तीने वसुल केली जात आहे पण गटारी तुंबलेल्या आहेत, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आजूबाजूच्या गटारी देखील स्वच्छ केल्या जात नाहीत. या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. शिवाय कोव्हीड सारख्या महाभयंकर आजाराला निमंत्रण देण्याचा हा प्रकार आहे. तुम्ही पुरेसे पाणी देत नसाल आणि स्वच्छता करत नसाल, तुम्हाला नागरिकांच्या आरोग्याची काळजीच नसेल तर आम्ही घरपट्टी पाणीपट्टी का भरावी ? असा सवाल करत या प्रश्नी नगरपालिकेने गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही मुल्ला गल्लीतील रहिवाशांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी नगरसेवक अमर शितोळे, अय्याज मुल्ला, प्रसाद लिपारे यांच्यासह मुल्ला गल्ली परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

अन्यथा आंदोलन करू : अमर शितोळे

ऐन उन्हाळ्यात विटा पालिका शहरवासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे, पाण्यासाठी लोकांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. प्रत्येकवेळी विचारणा केली की काही तरी उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. शहरातील मध्यवर्ती वस्तीतील मुल्ला गल्लीतील ही परिस्थिती आहे तर उपनगरात याही पेक्षा जास्त नागरिकांचे हाल होत आहेत. जुलमी घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करताना मात्र तत्परता दाखवली जात आहे. कारभारात तातडीने सुधारणा झाली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा नगरसेवक अमर शितोळे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments