Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात १२६४ कोरोना पाॅझिटीव्ह, पहा तालुकानिहाय आकडेवारी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात १ हजार २६४ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दुसरीकडे एकाच दिवशी जिल्ह्यातील १९ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट आणि मृत्युचा तांडव सुरु झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. 

सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे १ हजार पेक्षा अधिक नवीन रुग्णांची वाढ होत आहे. तर हाॅस्पीटल फुल्ल झाल्याने बेड आणि वेळेत उपचार न मिळाल्याने आता सरासरी वीस पेक्षा अधिक रुग्णांचा बळी जात आहे. आज गुरुवारी एकाच दिवशी १९ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. आज सांगली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २७४ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच खानापूर तालुक्यात आज तिघांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा विस्फ़ोट आणि मृत्युच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. 

आज सांगली जिल्ह्यात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ११२ , जत १७३, कडेगाव १२४, कवठेमंहकाळ ३७ , खानापूर ८९, मिरज १११, पलूस ४२ , शिराळा १०२ , तासगाव ८५ वाळवा ११५, तसेच सांगली शहर १८२ आणि मिरज शहर ९२ असा सांगली जिल्ह्यातील १ हजार २६४ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ९ हजार ७१८ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर आज दिवसभरात ४६३ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. 
-------------------------------

Post a Comment

0 Comments