Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत अग्निशमन विभागाकडून आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून मनपाक्षेत्रातील सर्व कोविड रूग्णालयांना आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने हे प्रशिक्षण दिले जात आहे.

राज्यात हॉस्पिटलमध्ये आगीच्या दुर्घटना घडण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमिवर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी यापूर्वीच मनपा क्षेत्रातील खासगी सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यानुसार तीन महिन्यापूर्वीच मनपा क्षेत्रातील रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. आता सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आग लागल्यास ती कशी विझवावी याबाबतचे प्रशिक्षण देण्याचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्या सह अग्निशमन जवानांनी 
मनपा क्षेत्रातील कोविड रुग्णालयांत जाऊन कर्मचाऱ्यांना अग्नी सुरक्षा यंत्रे कशी वापरावीत , आगीवर कसे नियंत्रण आणावे, अग्नी सुरक्षा सिलेंडर कसा वापरावा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. सांगलीतील साद कोविड हॉस्पिटलमध्ये अग्निशमन विभागाने प्रात्यक्षिक घेत सर्वाना आग प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत माहिती दिली.

Post a Comment

0 Comments