Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री जयंत पाटलांनी भाजपाच्या कामाचे श्रेय लाटू नये : मोरे

इस्लामपुर (हैबत पाटील) : वाळवा शिरगांव दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुल उभारणीला शासकीय मंजुरी मिळाली असुन सदर पुल उभारणीसाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदर कामास मंजुरी देण्याबरोबर आवश्यक असणारा निधी मंजुर केला आहे. या कामाच्या पाठपुराव्याचा व निधी मंजुरी चा राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा काडीमात्र संबध नसल्याची माहीती वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी दिली.

वाळवा तालुक्यातील शिरगांव हे गांव अनेक वर्षापासुन विकासापासुन वंचित राहीले आहे. सदर पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षापासुन ची होती यापुर्वी राष्ट्रवादीची राज्यात व केंद्रात ही सत्ता होती मात्र त्यावेळी सदर पुल उभारणीसाठी मंजुरी द्यावी, निधी मंजुर करावा व जनते ची मागणी पुर्ण करावी हे शहाणपन राष्ट्रवादी ला का सुचले नाही. आता मंजुरी केंद्र सरकारची, निधी मंजुर भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा असताना याचे श्रेय राष्ट्रवादीने घेऊ नये.

सदर काम केंद्रीय रस्ते विकास योजनेतुन मंजुर झाले असुन या कामासाठी ३३ कोटी ८७ ला इतका निधी भाजपाचे केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुर केला आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ची मागणी खर्‍या अर्थाने पुर्ण झाली असुन या कामाच्या मंजुरीचे स्वागत भाजपाच्या कार्यकर्त्यांच्यातुन व नागरीकांच्यातुन होत आहे.

वाळवा शिरगांव परीसरातील नागरीकांनी यापुर्वी तात्कालीन मंत्री आ. सदाभाऊ खोत यांचेकडे सदर पुलाच्या कामाबाबत मागणी केली होती. यावेळी आ. सदाभाऊ खोत यांनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील (दादा) यांच्या सहकार्यातुन थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा केला होता यामुळेच या कामाची व निधी ची मंजुरी झाली आहे.

यावेळी वाळवा तालुका भाजपाच्या महिला आघाडी च्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत,भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने,विक्रम शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments