Daily Mahasatta

Daily Mahasatta

खैराव येथील विवाहितेचा छळ ; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जत (सोमनिंग कोळी ) : जत तालुक्यातील खैराव येथील विवाहितेस तुझ्या वडिलांचे आजारपण आहे तू इथे राहू नकोस, रहायचे असेल तर वडिलांची जमीन विकून दहा लाख रुपये घेवून ये मगच इथे नांदायचे असे म्हणत पती, सासू, दिर, भावजय यांनी विवाहित महिलेस जबर मारहाण करून घरातून हाकलून दिले.

याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील पती सागर श्रीमंत सांगोलकर, सासू सुशीला श्रीमंत सांगोलकर, सासरा श्रीमंत विठोबा सांगोलकर, संगीता सचिन सांगोलकर, सतीश श्रीमंत सांगोलकर, विद्या सतीश सांगोलकर व विठ्ठल हणमंत सांगोलकर या आठ जणांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, जत तालुक्यातील खैराव येथील मुलीचा मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील सागर श्रीमंत सांगोलकर याच्याशी ११ डिसेंबर २०१९ रोजी विवाह झाला. सागर हा मुंबई येथे कामास असल्याने तो अधूनमधून येत असे. लग्नाच्या दिवसापासून ताटाला वाटकणी का लावली नाही म्हणून वाद सुरू आहे. लग्नादिवशीच सासरच्या लोकांनी पाच हजार रुपये हट्ट करून घेतले. तेव्हापासून आजतागायत त्रास सुरू आहे.

माझ्या वडिलांची खैराव येथे शेत जमीन आहे ती विकून दहा लाख रुपये आण नाहीतर येथे रहायचे नाही म्हणून मला शिवीगाळ, मारहाण करून घरातून हाकलुन दिले आहे. पती सागर श्रीमंत सांगोलकर, सासू सुशीला श्रीमंत सांगोलकर, सासरा श्रीमंत विठोबा सांगोलकर, संगीता सचिन सांगोलकर, सतीश श्रीमंत सांगोलकर, विद्या सतीश सांगोलकर व विठ्ठल हणमंत सांगोलकर या आठ जणांपासून आपल्या जीवितास धोका असल्याचेही पीडित विवाहित महिलेने नमूद केले आहे. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर जत पोलिस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments