Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा पालिकेच्या कोव्हीड सेंटर मध्ये मोफत उपचार मिळावेत : मनसे

विटा (प्रतिनिधी) : विटा शहर आणि खानापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी विटा नगरपरिषदेने आयटीआय काॅलेज जवळील शासकीय निवासी शाळेत ३८ बेडचे कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. या कोव्हीड सेंटर मध्ये सर्व सामान्य लोकांना मोफत उपचार मिळावे, अशी मागणी मनसे चे तालुकाध्यक्ष साजीद आगा यांनी केली आहे. 

तहसीलदार ॠषिकेत शेळके यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे, विटा शहर आणि परिसरातील कोव्हीड रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी विटा पालिकेच्यावतीने कोव्हीड सेंटर सुरु केले आहे.
परंतु हे रूग्णालय हे शासकीय इमारतीमध्ये उभे केले असून यासाठी लाईट पाणी सर्व व्यवस्था शासकीय आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात नगरपालिकेने आव्हान केले होते. त्यावेळी तालुक्यातील गलाई बांधवांनी व दानशूर व्यक्तींनी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होईल यासाठी पैसे व मशिनरी नगरपालिकेला दिल्या होत्या. त्या गेल्या कुठे? मग ही मदत कोणाच्या कामाची ? या रूग्णालया साठी एक ही पैसा नगरपालिकेने स्वतःचा खर्च केला नसून लोकवर्गणीतून हा सर्व पैसा उभा करण्यात आला आहे. यासाठी लागणाऱ्या मशिनरी या सर्व वस्तू लोकसहभागातून तेथे बसवण्यात आल्या आहेत. म्हणूनच तालुक्यातील व शहरातील सर्वसामान्य जनतेला या रूग्णालयात मोफत उपचार करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments