Daily Mahasatta

Daily Mahasatta

आटपाडीत राष्ट्रवादी तर्फे डॉ.आंबेडकरांना अभिवादन

आटपाडी (प्रतिनिधी) : विश्वनायक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनानिमित्त आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले या महामानवांच्या प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे खानापूर - आटपाडीचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिता पाटील यां मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गेले .

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, तालुका सरचिटणीस विजय पुजारी, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, भाऊसाहेब लिंगडे, दामोदर लिंगडे, अतुल घाडगे, रमेश खरात, अल्लाउद्दीन मुलाणी, नुतन भंडारी, नीता सावंत, वैशाली सावंत या उपस्थित होत्या .

Post a Comment

0 Comments