Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलूस तालुका शिवसेनेच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

पलूस (प्रतिनिधी) : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना पलूस तालुक्याच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे ६० बाटल्या रक्त संकलित झाले. 

महाराष्ट्रामध्ये करोनाने हाहाकार माजवला असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोराना चे हजारो पेशंट सापडत आहेत. त्यामुळे सध्या आरोग्य व्यवस्थेवर फार मोठा ताण आला आहे. रक्ताचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा या ठिकाणी जाणवतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते की संस्थांनी, तरुण मंडळे संघटनांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. या आवाहानाला प्रतिसाद म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख मा. प्रशांत दादा लेंगरे यांनी आज या दोन्ही महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील संग्राम भवन येथे शिबिर आयोजित केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. संजय बापू विभूते यांच्या हस्ते याचा हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. रक्तदात्यांनी प्रमाणपत्र आणि जेवणाचा डबा भेट देण्यात आला.
यावेळी उप तालुका प्रमुख दिपक शिंदे अक्षय होनकळसे, जगदीश पवार, अक्षय गायकवाड, प्रवीण गलांडे, श्रीकांत लेंगरे, गणेश माने, संजय हारूगडे, किरण पाटील, रिशी टकले, सुरज सूर्वे, निलेश आडसुळे, सुशांत सावंत, अमोल नरळे, अनिकेत डफळापूरकर, हरिष वडार, शरद गायकवाड, सागर जाधव संग्राम देशमुख, शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments