Daily Mahasatta

Daily Mahasatta

अखेर राज्यात लाॅकडाऊन जाहीर

मुंबई ( प्रतिनिधी)
कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी शनिवार ता. १० आणि रविवार ता. ११ रोजी दोन दिवसाचा विकेंड लाॅकडाऊन लावला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

मंत्री नवाब म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी राज्य मंत्री मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शनिवार, रविवार या दोन दिवशी कडक लाॅकडाऊन राहिल. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवार सकाळी ७ वाजे पर्यंत कडक लाॅकडाऊन राहिल. ऑफिस ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. या काळात भाजी मंडई देखील बंद राहतील. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. याबाबतची नियमावली लवकरच जाहीर होईल, अशी माहिती शासनाने दिली आहे. रिक्षा, टॅक्सी, ट्रेन बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments