Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापौरांनी घेतली कोरोनाग्रस्तांची ' थेट भेट '

" सांगलीचे नूतन महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी होमआयसोलेशन मध्ये असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या घरोघरी जाऊन त्यांना आधार दिला."

सांगली (प्रतिनिधी)
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नूतन महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेत कामाला सुरूवात केली आहे. नुकताच त्यांनी कोरोना झालेल्या पण होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची थेट त्यांच्या दारात जावून विचारपूस केली.

कोरोना म्हंटले की सर्वांना धडकी भरते. पण या रुग्णांना देखील आधाराची गरज असते. नेमके हेच ओळखून सांगलीचे नूतन महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी होमआयसोलेशन मध्ये असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी दौरा आयोजित केला. सांगली शहरातील होम आयसोलेशन रुग्णांच्या घरी समक्ष भेट देऊन त्यांची व कुटुंबियांच्या तब्बेतीबाबत त्यांनी विचारपुस केली.

यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी
महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधाची माहिती घेतली व दैनंदिन औषध फवारणी व आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविणेबाबत सूचना दिल्या. तसेच नागरिकांना मास्क वापरणे व सामासिक अंतर ठेवणेबाबत सूचना केल्या. कोविड लसीकरण करणे बाबत नागरिकांना जागृत केले. यावेळी समन्वय समिती मधील मनपा कर्मचारी, मनपा डॉक्टर व त्यांचा स्टाफ , मा सहाय्यक आयुक्त, औषध फवारणी पथक व मुकादम हजर होते. स्वतः महापौर यांनी रुग्णांच्या घरी भेट देऊन त्यांची चौकशी केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments