Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपुरातील हॉटेल पंगत, शिवभोजन केंद्राला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची भेट

इस्लामपूर : येथील हॉटेल पंगतच्या शिवभोजन केंद्रात भेटीवेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई , रणजित शिंदे, आनंदराव पवार

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : संचार बंदीच्या काळात गरीब- गरजूंना आधार देत असणाऱ्या आणि राज्य सरकारच्या वतीने मोफत दिल्या जाणाऱ्या शिवभोजन केंद्रावर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट दिली. ते आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते.

इस्लामपुरातील येथील हॉटेल पंगत शिवभोजन केंद्रात आज मंत्री देसाई यांनी भेट देत नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेतला. शिवभोजन केंद्राचे रणजित शिंदे यांनी स्वागत केले.

मंत्री श्री देसाई यांना आजच्या जेवणात असणारे पिठले ,मसाल्याचे वांगे,भात, चपातीचे हे दिले जाणारे पार्सल बद्दल माहिती देण्यात आले. यावेळी उपस्थित असणाऱ्या गरजू नागरिकाकडे मंत्री देसाई यांनी शिवभोजन विषयी चौकशी केली असता घरच्या पेक्षा चांगले जेवण मिळत असल्याचे त्यांनी माहिती दिली. एक वेळेस सरकारकडून जेवण देत असल्याबाबत त्यांनी आभार मानले.

मंत्री देसाई म्हणाले," गरजू ,गोरगरीब,छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आधार देण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री मंडळातील सर्व सदस्यांनी घेतली आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचना पाळाव्यात. कोरोनाच्या संकटातून निश्चित बाहेर पडू. केंद्राचे काम खुप चांगले आहे. गोर गरीब लोकांची सेवा करण्याचा लाभ तुम्हाला मिळाला आहे. या संधीचे प्रामाणिक पणे सोने करा." 

शिवभोजन केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती रणजित शिंदे यांनी दिली. विविध सणांच्या निमित्ताने इथं पुरणपोळीचे जेवण, महाशिवरात्रीला फराळ तर वर्धापन दिनाच्या निमित्ताने चिकन आणि मसुरा देण्यात आला होता. तर वर्षभरात सुमारे ५२ हजार थाळीचे वितरण करण्यात आले आहे. केंद्रात रणजित शिंदे यांच्या मातोश्री अलका शिंदे या मदत करतात. मंत्री देसाई यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घ्या असे सूचित केले. यावेळी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते, सागर मलगुंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments