Daily Mahasatta

Daily Mahasatta

साधुसंतांना लस देण्याबाबत दोन दिवसात निर्णय :मंत्री राजेंद्र यड्रावकर

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना गुजराती समाज महासंघाच्या वतीने निवेदन देताना वरिष्ठ पदाधिकारी.

शिराळा (विनायक गायकवाड) : जैन धर्मीय साधु - साध्वी समुदयासह सर्वधर्मीय साधु संताना तातडीने कोरोना लसीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे गुजराती समाज महासंघाने केली.
या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, सर्व संसार परित्याग करून साधु धर्माची दिक्षा घेणाऱ्या साधु - साध्वी समुदयाकडे आधार कार्ड कींवा इतर कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ठीक ठीकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व धर्मीय साधु संतासह जैन धर्मीय साधु - साध्वी समुदयाला तातडीने कोरोना लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेन्द्र पाटील यांनी वरील मागणीबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही गुजराती समाज महासंघास दिली. निवेदन देते वेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शाह, राज्य कार्यकारी समितीचे सदस्य तेजपाल शाह, अरविंद मणियार, प्रकाश शाह, युवराज शाह, स्वप्निल शाह, रोपन शाह, अक्षय शाह व अक्षय आलासे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments