Daily Mahasatta

Daily Mahasatta

वांगीत कृष्णा कारखान्याच्या मतदार यादीची होळी

कडेगाव (सचिन मोहिते) : यशंवतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी २ हजार ५२५ सभासदांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी अक्रीयाशिल ठरविल्याबद्दल वांगी (ता. कडेगांव) येथे मतदार यादीची होळी करण्यात आली. 
सदर प्रसिध्द केलेल्या यादिमध्ये सर्वात जास्त घाटमाथ्यावरील  ११९३ सभासद अक्रीयाशिल ठरवले आहेत.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांसह सत्ताधारी मंडळीनी  तब्बल २ हजार ५२५  सभासदांना अक्रियाशील ठरवण्यासाठी नोटीस पाठवली होती. या सभासदांची नावे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत. यावरून संबधित सभासदांचा  मतदानाचा अधिकार काढून घेण्यासाठी द्वेष व सुडाच्या भावनेतून सत्ताधारी मंडळींनी  केलेले कारस्थान आहे. गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी घाटमाथ्यावरिल सभासदांच्या बाबतीत अन्यायाची भूमीका घेतली असुन जाणून बुजुन तोडणी वाहतुक यत्रणा कमी देऊन घाटमाथा कार्यक्षेत्रातील ऊस अत्यंत कमी प्रमाणात गाळपासाठी नेला आहे. तोडणी वाहतुक कमी दिल्यामुळे येथे सभासद मोठया संख्येने अक्रीयाशील झाली आहेत. येथील सभासद वयस्कर असल्यामुळे वार्षीक सभेस हजर राहु शकत नाहीत. तरी या सभासदाना मतदानाचा अधिकार मिळाला पाहीजे, अशी मागणी अँड. प्रमोद पाटील यांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments